ब्युरो टीम : डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं का? कारण आजकाल कोणतंच काम फोन शिवाय होत नाही. फोनने असं काय होतं? आपण किती वेळ फोन हातात घेतो, स्क्रीन टाईम किती असतो याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. डोळे हा सर्वात नाजूक अवयव आहे त्यामुळे त्याची काळजी आवर्जून घ्यायला हवी. काय करता येऊ शकतं? बघुयात...
आजकाल कुठलंच काम मोबाईल, लॅपटॉप शिवाय होत नाही. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बरेचजण आपला खूप वेळ स्क्रीनवर घालवतात. चष्मा लागण्याचं हे मुख्य कारण आहे. स्क्रीनटाइम कमी केल्यास सगळं सहज शक्य आहे. तासनतास स्क्रीनसमोर काम करत असाल तर अर्ध्या तासाच्या अंतराने १० ते २० सेकंद डोळे बंद करून विश्रांती घ्या.

धूम्रपान करू नये हे तर आपण ऐकतच आलोय. पण या धुम्रपानामुळे डोळे सुद्धा कमकुवत होतात हे मात्र फार कमी लोकांना माहितेय. धूम्रपान केल्याने काचबिंदू, मोतीबिंदू यांसारख्या डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
मासे, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या यामुळे डोळ्याचं आरोग्य सुधारतं. चांगला आहार घेतल्यास तो डोळ्यांसाठी खूप चांगला असतो. व्हिटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ल्युटिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सारखे पौष्टिक पदार्थ डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर असतात.
आपण डोळ्यांच्या तपासणीत हलगर्जीपणा करतो. दर सहा महिन्याला डोळ्यांची तपासणी करायला हवी. वेळच्या वेळी तपासणी केली तर डोळ्यांच्या संबंधित कुठली समस्या असेल तर ती कळून चुकते.
मधुमेह, रक्तदाब या आजारांमुळे डोळ्यांची समस्या उद्भवते. रक्तदाब आणि मधुमेह असेल तर डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी. या तपासणीत मुख्यतः या दोन आजारांची तपासणी न चुकता करावी.
टिप्पणी पोस्ट करा