Gaur Gopal Das: कपिल शर्मा शो मध्ये गौर गोपाल दास पहा काय म्हणाले; रोमान्स करण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता…’

 

ब्युरो टीम ; गौर गोपाल दास यांचे अनेक प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौर गोपाल दास कायम त्यांच्या प्रेरणादायी वक्यव्यातून लोकांना जीवनाचा खरा अर्थ सांगण्याचं काम करत असतात. फक्त भारतात नाही तर, परदेशात जावून देखील गौर गोपाल दास लोकांना आयुष्याची योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवसांपूर्वी गौर गोपाल दास विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गौर गोपाल दास यांनी कपिल आणि प्रेक्षकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शोमध्ये कपिल याने गौर गोपाल दास यांना त्यांच्या लव्हलाईफबद्दल विचारलं


कपिल शर्मा याने गौर गोपाल दास यांच्या गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड यांसारख्या व्हिडीओचा उल्लेख करत, गौर गोपाल दास यांच्या खासगी आयु्ष्याच्या अनुभवाबद्दल विचारलं… यावर गौर गोपाल दास म्हणाले, ‘ इंजिनियरींगमध्ये माझं शिक्षण झालं आहे. अभ्यासात मी पूर्णपणे व्यस्त असायचो. रोमान्स करण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता…’

पुढे गौर गोपाल दास म्हणाले, ‘आता लोकं प्रेमात फसवणूक किंवा ब्रेकअप झाल्यानंतर मझ्याकडे येतात. ऐ दिल है मुश्किल म्हणणारे लोकं येतात, नशीब मला चन्ना मेरेया गाणं गाण्याची गरज भासत नाही…’ एवढंच नाही तर गौर गोपाल दास म्हणाले, ‘प्रत्येकाला स्वतःला जे आवडतं ते काम करायला हवं. कारण आपण आपल्या आयुष्यातील जास्त वेळ प्रोफेशनल आयुष्याला देत असतो…’ गौर गोपाल दास कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात.

कोण आहेत गौर गोपाल दास?

गौर गोपाल दास हे एक जीवन मार्गदर्शक आहेत. त्यांनी संन्यास घेतला असून ते आता लोकांना जीवनाचा खरा अर्थ सांगण्याचं काम करत आहेत. ते इस्कॉनचे कार्यकर्ते देखील आहेत. गौर गोपाल दास यांचा जन्म 1973 मध्ये महाराष्ट्रातच झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातून इलेक्ट्रिकल इंजिनियरींग केली. गौर गोपाल दास यांचे गुरु रामनाथ स्वामी आहेत. त्यांना आधीपासूनच सामाजिक कार्यात खूप रस होता.

गौर गोपाल दास हे उत्तम लेखक, वक्ता आहेत. ते कायम साध्या भाषेमध्ये तरुणांसोबत संवाद साधत त्यांना अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. एवढंच नाही तर, गौर गोपाल दास त्यांच्या विनोदबुद्धीने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतात. एवढंच नाही तर, ‘तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा…’ असं देखील गौर गोपाल दास अनेकांना सांगतात.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने