Goa : आर्यनकिड्सला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

 

ब्युरो टीम : आर्यनकिड्स गोवा रनची दुसरी आवृत्ती शनिवारी मिरामार पणजी येथे पार पडली. मुख्यमंत्र्याचे सचिव अजित रॉय, माजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे आणि कुटुंब कल्याण संस्थेचे अध्यक्ष हरलीन सोवनी यांच्या हस्ते या रनचे उद्घाटन करण्यात आले.

सदर आर्यनकिड्स गोवा रन आर्यनमॅन ७०.३ मॅराथोनच्या पार्श्वभूमीवर खास आर्यनमॅन मॅराथोनबाबत जागृती करण्यासाठी आणि राज्यात बऱ्यापैकी वातावरण तयार व्हावे, यासाठी करण्यात आले होते. तसेच लहान मुलांमध्ये फिटनेस विषयी जागृती होणे हेही या रनचे मुख्य उद्देश आहे. सहा ते सोळा वर्षीय वयोगटातील मुलांसाठी ही रन होती. दरम्यान चिमुकल्यांचे स्पर्धात्मक प्रदर्शन, ऊर्जा आणि उत्साह दिसून आले.

६ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी १ कि.मी धावणे, ९ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी २ कि.मी धावणे व १३ ते १६ वर्षीय मुलांसाठी ३ कि.मी धावणे अशा तीन विभागात ही स्पर्धा झाली. दरम्यान येथे सहभागी स्पर्धकांच्या पालकांनी, मित्रमंडळींनी व हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक आणि पदके प्रदान करण्यात आली.

स्पर्धा जिंकण्यावर भर न देता मुलांनी स्पर्धेत भाग घेणे आणि या स्पर्धेचा आनंद घेणे आवश्यक होते. पौष्टिक आहार, निरोगी जीवन हाच या रनचा मुख्य हेतू होता. लहान मुलांनी स्फूर्तीने या स्पर्धेत भाग घेतले, हे पाहून खुप आनंद झाला, यातूनच भविष्यातील मॅराथोनपटू तयार होतील.

- दीपक राज, आयोजक

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने