Hair Care Tips :केस गळती थांबवा; अगोदर हे घरगुती उपाय करा

 

ब्युरो टीम : लांबसडक, घनदाट केस आपल्याला चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. पण हल्ली गळणाऱ्या केसांमुळे भारतातील ९० टक्के लोक हैराण आहेत. केसगळतीच्या समस्यांना रोखण्यासाठी आपण अनेक नॅचरल पदार्थांचा वापर करतो.

केस सतत गळत राहिले तर टाळूवर स्काल्पची त्वचा दिसू लागते. केसांची काळजी घेताना अनेक महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपायांचा वापर केला जातो. केसांना नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील फ्लेक्ससीड फायदेशीर ठरेल.  

केसांसाठी फ्लेक्ससीड फायदेशीर आहे. यामध्ये असणारे घटक उत्तम पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने ते टाळू आणि केसांसाठी चांगले आहे. जाणून घेऊया याचा केसांसाठी फायदेशीर  ठरेल हे जाणून घेऊया.

अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध फ्लेक्ससीड केसांसाठी तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. यात असणारे घटक केसांच्या कूपांचे पोषण करण्यात तसेच केस सॉफ्ट करण्यास मदत करते. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.

1. फ्लेक्ससीड जेल

फ्लेक्ससीड केसांसाठी जेल म्हणून वापरु शकतात. हे जेल तयार करण्यासाठी फ्लेक्ससीड, एलोवेरा जेल आणि पाणी लागेल. केसांना व्यवस्थितरित्या हे जेल लावून टाळूवर हलक्या हाताने मालिश करा. १५ मिनिटांनी केस धुवा

2. फ्लेक्ससीड तेल (Oil)

केसांना अधिक मजबूत बनवण्यासाठी फ्लेक्ससीड तेल बहुगुणी ठरेल. केसांसाठी हे तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा. सुमारे पाच ते दहा मिनिटे टाळूला मसाज करा. केस वाढण्यास मदत होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने