Health: नागिणीचे पाने खा; तुमच्या शरीरातील ‘या’ 3 समस्यांवर जालीम उपाय पहा

 

ब्युरो टीम :  बहुतेक लोकांना पान खायला मोठ्या प्रमाणात आवडते. आजकाल जेवण केल्यानंतर लोक पान आवर्जून खाताना दिसतात. त्यात सध्या पानाचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात. त्यामुळे लोक आवडीनं पान खाताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का की याच पानाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोटाच्या विकारांसाठी पान फायदेशीर मानले जाते. तर याच पानाच्या पाण्याचे देखील काही गुणकारी फायदे आहेत. तर आता आपण पानाच्या पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

काही लोकांना पोटात जळजळ होण्याचा त्रास सतावत असतो. यासाठी पानाचे पाणी फार फायदेशीर आहे. पानाचे पाणी पिल्यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसंच हे पाणी पिल्यामुळे शरीरातील उष्णता देखील कमी होण्यास मदत होते. तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी पानाचे पाणी प्यावे यामुळे जळजळ कमी होते आणि पचनाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका होते.

बहुतेक लोकांना आतड्याला सूज आल्याची समस्या निर्माण होताना दिसते. अशावेळी पानाचे पाणी पिणे गरजेचे आहे. कारण हे पाणी पिल्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. तसंच आतड्याला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. तसंच तुमची पचनक्रीया सुधारण्यास देखील मदत होते. त्यामुळे पानाचे पाणी पिणे गरजेचे आहे.

आजकाल लोक बाहेरचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. तर फास्टफूड खाल्ल्यामुळे अनेक लोकांना ॲसिडीटीचा त्रास होतो. तर अशावेळी पानाचे पाणी पिल्यामुळे ॲसिडीटी कमी होण्यास मदत होते. तसंच हे पानी पिल्यामुळे अपचन सारख्या समस्यांपासून देखील सुटका मिळते. त्यामुळे पानाचे पाणी पिणे फायदेशीर आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने