Health : कारले जास्त खाणे हानिकारक; कोणते आहेत असे आजार, बघुयात...

 

ब्युरो टीम: कारलं म्हणलं की सगळ्यांच्या भुवया उंचावतात. कारलं आरोग्यासाठी जितकं चांगलं असतं तितकंच ते हानिकारक सुद्धा असतं. कधी? जेव्हा त्याचं अति सेवन केलं जाईल तेव्हाच. काही विशिष्ट आजार आहेत ज्यात कारलं खाणं अजिबात चांगलं नाही आणि काही असे आजार सुद्धा आहेत जे कारल्याच्या अति सेवनाने होतात. कोणते आहेत असे आजार, बघुयात...

कडू कारलं कुणालाच आवडत नाही. मोजक्याच लोकांना ही भाजी आवडत असेल. तुम्ही आजवर कारलं खाण्याचे फायदे वाचले असतील. आज कारल्याच्या अति सेवनाने काय होतं ते बघुयात...

कारलं आरोग्यासाठी चांगलं असतं पण टाईप १ मधुमेह ज्यांना आहे त्यांनी कारले खाऊ नये. का? कारण कारले रक्तातील साखर कमी करते, टाईप १ मधुमेह असणाऱ्यांसाठी हे धोकादायक आहे. अचानक साखर कमी झाली तर अशक्तपणा येऊ शकतो त्याने चक्कर येऊ शकते. त्यामुळे हा आजार असलेल्यांनी कारल्याचे अतिसेवन करू नये. 

गरोदर महिलांनी कारल्याची भाजी, कारल्याचे पदार्थ खाणे टाळावे. कारलं खाल्ल्याने गर्भाशयावर आणि गर्भातील बळावर परिणाम होतो त्यामुळे कारल्याचे सेवन करू नये. 

कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट आढळते. ऑक्सलेटमुळे किडनी स्टोन होतो. कारल्यामुळे किडनीवर परिणाम होतो त्यामुळे ज्या-ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे त्या लोकांना कारल्याचं सेवन करू नये असा सल्ला दिला जातो.  

खरं तरं कारलं कडू असल्याने फायदाही तितका आहे आणि तोटाही तितकाच आहे. पण आपण कारल्याचा कडवटपणा कमी करू शकतो. कारले चांगले धुवून घ्या, त्यातल्या बिया काढा त्या अधिक कडू असतात. कारलं उकडून घेतलं की कडवटपणा कमी होतो, उकडताना त्यात तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने