Health : खतरनाक! आवळा एक, पण फायदे अनेक



ब्युरो टीम : चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. त्यामुळे प्रत्येकानं आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. कारण आवळा हे एक पौष्टिक रत्न आहे, कारण त्यात कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. यातील व्हिटॅमिन सी एकाग्रता, निरोगी त्वचा, उत्तम रोगप्रतिकारकशक्तीसाठी उपयुक्त आहे.  चला तर, या आवळ्याचे फायदे काय आहेत, ते जाणून घ्या.

पचनसंस्था बळकट होते

आवळ्याचे अल्कधर्मी गुणधर्म शरीराची स्वच्छता आणि पचनसंस्था बळकट करण्यात मदत करतात. आवळ्याचा रस पचन सुधारण्यासाठी उत्तम आहे. कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

मधुमेह नियंत्रण

आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचं तत्व असते, जे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करते. आवळ्याचा रस पिण्यानं रक्तातील साखरेची सामान्य पातळी राखण्यात तसेच मधुमेह आणि त्यासोबत वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

फायबरचा स्त्रोत

आवळ्याचा रस फायबरचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. साहजिकच, यामुळे तुमचे खाण्यावर नियंत्रण राहू शकते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

चयापचय क्रिया उत्तेजित होते

आवळा तुमची चयापचय क्रिया उत्तेजित करण्यास मदत करते. तुमचे शरीर तुम्ही खात असलेले अन्न हे द्रव उर्जेमध्ये बदलते. तुमचे चयापचय जितके जलद होईल, तितक्या लवकर तुम्ही तुमच्या सर्व कॅलरी बर्न करीत असता.

अँटिक्सॉइडंट समृद्ध फळ

आवळ्याच्या रसातील मुबलक अँटिऑक्सिडेंट व त्याची शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता, हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याव्यतिरिक्त, आवळ्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे अन्नाचे सेवन करण्यावर अधिक नियंत्रण ठेवता येते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने