ब्युरो टीम : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अनहेल्थी पदार्थ, व्यायाम न करणं अशा अनेक गोष्टींमुळे आपली प्रतिकार शक्ती कमजोर होते. त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान वाढते. तसंच आपण आजारी पडल्यानंतर औषधं घेतो. याच औषधांचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या पोटातील उष्णता वाढते. तसेच बहुतेक लोकांच्या पायत जळजळ होत असते. तर पायात झालेली जळजळ आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात.
बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही त्यामुळे अनेक वेगवेगळे आजार निर्माण होतात. अशा वेळी खडीसाखर आणि बडीशेपचे पाणी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खडीसाखर आणि बडीशेपच्या पाण्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. खडीसाखर मुळे तुमचे हार्मोनल आरोग्य सुधारते. तसेच बडीशेप हे आपल्या झोपेला चालना देण्यासाठी मदत करते.
बहुतेक लोकांच्या पायात जळजळ होते, वेदना होत असतात. अशावेळी बडीशेप आणि खडीसाखर खूप उपयुक्त ठरते. काही लोकांना डीहायड्रेशनची समस्या असते किंवा उच्च रक्तदाब होतो अशावेळी पायात जळजळ होते. अशावेळी बडीशेप चे पाणी आणि खडीसाखर ही समस्या दूर करण्यास मदत करते. बडीशेप चे पाणी हे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी करते तसेच आपल्या शरीराला थंडावा देखील देते.
बहुतेक लोकांच्या पोटातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे ऍसिडिटी, अपचन, पित्त अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी बडीशेप चे पाणी आणि खडीसाखर तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरते. बडीशेप चे पाणी आणि खडीसाखरमुळे आपल्या पोटाला थंडावा मिळतो तसेच यामुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते आणि पोटातील उष्णता कमी होते.
टिप्पणी पोस्ट करा