ब्युरो टीम : प्रत्येकजण निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणं, व्यायाम करणं या गोष्टी करत असतं. त्यात पौष्टिक आहारामध्ये लोकं ड्रायफ्रूटचा समावेश आवर्जून करतात. ड्रायफ्रूट्समध्ये अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे लोक ड्रायफ्रूट्स आवर्जून खाताना दिसतात. मग काही लोक रात्री पाण्यात ड्रायफ्रूट भिजवतात आणि सकाळी उठल्यानंतर खातात. तर काही लोक ड्रायफ्रूट्स भाजतात आणि मग ते पदार्थांमध्ये वापरतात किंवा तसेच खातात. पण तुम्हाला माहिती आहे का असं खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो.
फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स खाणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर नाहीये. कारण ड्रायफ्रूट्समध्ये फायबर, विटामिन असते. तर ड्रायफ्रूट्स आपण फ्राय केल्यानंतर ते गुणधर्म त्यातून नष्ट होतात. तसेच ड्रायफ्रूट्स मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे गुणधर्म असतात. पण तुम्ही जर ड्रायफ्रूट्स फ्राय करून खाल्ले तर हे गुणधर्म देखील त्यातून नष्ट होतात. त्यामुळे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर नाहीये. त्यामुळे तुम्हीही फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे.
तर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत सांगायची झाली तर, बहुतेक लोकांना ड्रायफ्रूट्स पचत नाहीत अशावेळी तुम्ही हे ड्रायफ्रूट्स फक्त भाजून खाऊ शकता. पण ड्रायफ्रूट्स भाजताना तेलाचा वापर करू नका. तेल न वापरता पॅनमध्ये तुम्ही फक्त ड्रायफ्रूट्स भाजून ते खाऊ शकता. पण ते ड्रायफ्रूट जास्त भाजले जाणार नाहीत याची काळजी घ्या जेणेकरून त्यातील गुणधर्म नष्ट होणार नाहीत.
ड्रायफ्रूट्स तुम्ही भिजवून खाऊ शकता. काजू, बदाम, अंजीर, खजूर हे तुम्ही रात्री भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर खाऊ शकता. तसेच खजूर तुम्ही दुधात उकळून खाऊ शकता हे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामुळे तुमच्या शरीराला ड्रायफ्रूट्समधील पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे कधीही ड्रायफ्रूट्स भिजवून खा किंवा तसेच कोरडे खा.
टिप्पणी पोस्ट करा