ब्युरो टीम : सूर्यनमस्कार करणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तज्ञ आणि डॉक्टर देखील लोकांना सूर्य नमस्कार करण्याचा सल्ला नेहमी देतात. सूर्यनमस्कारांमधली काही योगासने आहेत जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. योगासने मेंदूंपासून ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत काम करत असतात. योगासनं केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते असे अनेक फायदे होत असतात.
जर तुम्हाला हिप फॅट कमी करायचे असेल तर सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार केल्यामुळे आपले शरीर लवचिक होते. तसेच सूर्यनमस्कार केल्यामुळे तुमचे शरीर अधिक चांगले लवचिक होण्यास मदत होते. सोबतच तुमच्या वरच्या मांड्या आणि स्नायू लवचिक होण्यास मदत होते. जेव्हाही तुम्ही सूर्यनमस्कार करता तेव्हा तुमची चरबी जळून जाते, त्यामुळे तुमचे वजन कमी होते. त्यामुळे हिप फॅट कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहे.
जर तुम्ही दररोज 12 योगासने केली तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे ही बारा योगासने तुम्ही नियमितपणे करणे गरजेचे आहे. यामुळे हिप फॅट कमी होण्यास मदत होते. तसंच कॅलरी बर्न देखील होण्यास मदत होते.
तुम्हालाही हिप फॅट कमी करायचे असेल तर दररोज सूर्यनमस्कार करा. यासाठी दररोज दिवसातून दोन वेळा सूर्यनमस्कार करावा. यामध्ये योगाचे 12 संच असतात जे दोनदा पूर्ण करणे म्हणजे 24 वेळा व्यायाम केला जातो. तुमच्या फिटनेसनुसार तुम्ही हा व्यायाम करा. हे दररोज केल्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज सूर्यनमस्कार करा.
टिप्पणी पोस्ट करा