Health : हृदयरोगापासून दूर व्हायचे आहे तर चला एवढ्या पायऱ्या

 

ब्युरो टीम:बदलत्या राहणीमानामुळे लोकांना हृदयासंबंधी आजार होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. गेल्या काही वर्षांत कमी वयातील मुलांना देखील हार्टअटॅक येऊन त्यांना ऐन उमेदीत मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. बैठे काम आणि आहाराच्या चुकीच्या सवयी याचा परीणाम आरोग्यावर होत आहे. एका नव्या संशोधनात हृदयरोगाचा धोका कमी करायचा असेल तर दररोज ठराविक पायऱ्या चढणे गरजेचे आहे. काय आहे नेमके संशोधन ते पाहूयात…


तुलाने युनिव्हर्सिटीचे संशोधन

तुम्हाला जर हृदयरोगापासून दूर रहायचे असेल तर दैनंदिन रोज पायऱ्या चढणे आणि उतरणे व्हायला हवेच. लिफ्टचा वापर ठरवून बंद करायला हवा. रोज किमान 50 पायऱ्या चढल्या तर तुम्हाला हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होईल. अमेरिकेतील लुईसियाना येथील तुलाने युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात हा खुलासा झाला आहे. हा अभ्यास अहवाल एथेरोस्क्लेरोसिस जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

काय म्हणतात संशोधक

लुसियानातील तुलाने युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर डॉ. लू. क्यूई यांनी म्हटले की उंच पायऱ्या चढणे हे कार्डीओ रेस्पिरेटरी फिटनेस आणि ल्युपिड प्रोफाईलमध्ये सुधारणा करण्याचा उत्तम मार्ग आहे. खासकरुन ज्या लोकांना व्यायाम करायला मिळत नाही त्यांच्यासाठी हा चांगला उपाय आहे.

साडे चार लाख वयस्काचा डाटा एकत्र केला

या संशोधनात सुमारे 4 लाख 50 हजार वयस्कांचा एकत्र केलेल्या युके बायोबॅंक डाटाचा वापर केला गेला आहे. अभ्यासात सहभागी असलेल्या उमेदवारांच्या कुटुंबाचा इतिहास, सध्याचे आजार आणि आनुवंशिक आजाराचे धोके याच्या आधारे हृदयरोगासंबंधी संवेदनशीलतेची मोजणी केली. तसेच उमेदवारांना त्यांची जीवनशैलीतील सवयी आणि जिने चढण्याचे प्रमाण याचे सर्वेक्षण केले गेले. त्यातील निष्कर्षात आढळले की दररोज अधिक जिने चढल्याने विशेष रुपाने त्या लोकांना हृदयरोगाचा धोका कमी झाला जे कमी संवेदनशील होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने