ICC ODI World Cup 2023 : वर्ल्डकपच्या आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय; केला हा महत्व्वाचा बदल


ब्युरो टीम : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला आता 50 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी बीसीसीआयने वर्ल्ड कपमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला वारंवार टीकेचा सामना करावा लागत आहे. बीसीसीआयने सर्वात आधी वर्ल्ड कप सामन्यांचं वेळापत्रक बदललं. त्यानुसार 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला गेला. त्यानंतर वर्ल्ड कप तिकीट विक्रीवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. बीसीसीआयच्या या कारभारामुळे अनेकदा टीका करण्यात आली.

त्यानंतर आता आयसीसी वर्ल्ड कप ओपनिंग सेरेमिनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. वर्ल्ड कपच्या एक दिवस आधी म्हणजे 4 ऑक्टोबरला ओपनिंग सेरेमनी नियोजित आहे. मात्र हा रंगारंग कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्याबाबत अजून बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रंगारंग कार्यक्रम होणार नसल्याच्या चर्चामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

बीसीसीआयने 4 ऑक्टोबर रोजी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानुसार या कार्यक्रमात दिग्गज आशा भोसले, रणवीर सिंह, तमन्ना भाटीया आणि श्रेया घोषाल हे सादरीकरण करणार होते. इतकंच नाही. तर अर्जीत सिंह आणि शंकर महादेवन हे देखील आपल्या गाण्याने क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणार होते.मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार ओपनिंग सेरेमनी होणार नाही, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे.

4 ऑक्टोबर रोजी फक्त एकूण 10 संघाचे 10 कर्णधार एकमेकांना भेटतील. या सर्व कर्णधाराचं फोटोसेशन पार पडेल. त्यानंतर लेजर शो पार पडेल. मात्र याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 5 ऑक्टोबर रोजी होईल. या सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध उपविजेता न्यूझीलंड टीम आमनेसामने असणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने