ब्युरो टीम : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला काही खास सुरुवात करता आलेली नाही. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नेंदरलँड्सच्या ऑरेंज आर्मीने पाकिस्तानची हालत खराब केली आहे.
सौद शकील व मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला, परंतु त्यांनाही मागे पाठवून नेदरलँड्सने सामना गाजवला. ३ बाद ३८ वरून पाकिस्तानने चांगले पुनरागमन केले, परंतु त्यांना पूर्ण ५० षटकं नाही खेळता आली.
नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. फखर जमान ( १२), इमाम-उल-हक ( १५) आणि बाबर आजम ( ५) हे ३८ धावांवर माघारी परतले होते. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी ११४ चेंडूंत १२० धावा जोडल्या आणि आर्यन दत्तने पाकिस्तानला धक्का दिला. शकील ५२ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६८ धावांवर झेलबाद झाला. डी लीडने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. ६८ धावा करणाऱ्या रिझवानचा त्याने त्रिफळा उडवला. इफ्तिखार अहमदही ( ९)त्याच षटकात माघारी परतला.
शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी ६० धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले. शादाब ३२ धावांववर त्रिफळाचीत झाला. डी लीडने पुढच्या षटकात हसन अलीला गोल्डन डकवर माघारी पाठवले आणि ही त्याची चौथी विकेट ठरली. मोहम्मद नवाज ( ३९) रन आऊट झाला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९ षटकांत २८६ धावांवर तंबूत परतला.
\
टिप्पणी पोस्ट करा