ब्युरो टीम : एका मोठ्या टीमने आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये काही खास प्रदर्शन केलेलं नाहीय. अपेक्षेनुसार त्यांना खेळ दाखवता आलेला नाहीय. ही टीम आतापर्यंत पाच सामने खेळलीय. त्यातल्या फक्त एका मॅचमध्ये त्यांना विजय मिळवता आलाय. चार मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये खराब प्रदर्शन करणारी ही टीम आहे, बांग्लादेश. चालू टुर्नामेंटमध्ये टीमच इतक खराब प्रदर्शन सुरु असताना कॅप्टनच अचानक मायदेशी परतलाय. कॅप्टन शाकीब अल हसन टीमची साथ सोडून एका व्यक्तीला भेटण्यासाठी मायदेशी निघून गेलाय. शाकीब टीमची साथ सोडून ढाकाला निघून गेलाय. सगळी टीम आपला पुढचा सामना खेळण्यासाठी कोलकात्ता येथे पोहोचलीय.
बांग्लादेशची टीम आपले पुढचे दोन सामने कोलकाता येथे खेळणार आहे. 28 ऑक्टोबरला बांग्लादेश विरुद्ध नेदरलँड सामना होणार आहे. 31 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळायचा आहे. दोन्ही सामने बांग्लादेशसाठी महत्त्वाचे आहेत. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. शाकीब आपला मेंटॉर नजमुल अबेदीन फहीमला भेटण्यासाठी ढाका येथे गेलाय. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, शाकीब बुधवारी दुपारी ढाका येथे पोहोचला.
म्हणून परत गेला
बांग्लदेशला मागच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 149 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुढच्याच दिवशी शाकीब ढाका येथे पोहोचला. थेट तो शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये गेला. शाकीबने तिथे तीन तास सराव केला. शाकीबने या दरम्यान थ्रोडाऊनची प्रॅक्टिस केली. शाकीब तीन दिवस सराव करेल, असं फहीमने सांगितलं. त्यानंतर तो पुन्हा कोलकात्याला परतेल. त्याच्याकडून निराशा
शाकीबने या वर्ल्ड कपमध्ये काही खास प्रदर्शन केलं नाहीय. फलंदाजीत त्याला संघर्ष करावा लागतोय. तो चार मॅच खेळलाय. पण एकाही सामन्यात त्याला अर्धशतक झळकवता आलेलं नाहीय. न्यूझीलंड विरुद्ध जरुर त्याने 40 धावा केल्या. पण त्याशिवाय तो कुठलीही प्रभावी इनिंग खेळू शकलेला नाहीय. गोलंदाजीत त्याची कामगिरी थोडी चांगली होती. चार सामन्यात त्याने सहा विकेट घेतलेत.
टिप्पणी पोस्ट करा