ब्युरो टीम : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या दहाव्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 209 धावांवर रोखलं आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 43.3 ओव्हरमध्ये 209 धावांमध्ये गुंडाळलंय. त्यामुळे कांगारुंना वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवण्यासाठी 210 धावांचं आव्हान मिळालं. आहे श्रीलंकेने 125 धावांची सलामी भागादारी केली. मात्र त्यानंतर कांगारुंनी जोरदार कमबॅक करत लंकादहन केलं. कांगांरुनी अवघ्या 84 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यामुळे आता श्रीलंकेचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात की कांगारु पहिला विजय नोंदवतात, याकडे लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.
टिप्पणी पोस्ट करा