Icc World Cup 2023 :बांगलादेशची अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय; वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात,

 

ब्युरो टीम : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील डबल हेडरमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पार पडला. हा सामना बांगलादेशने 6 विकेट्सने जिंकत विजयी सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 157 धावांचं माफक आव्हान बांगलादेशने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. बांगलादेशने हे आव्हान 94 बॉल राखून पूर्ण केलं. बांगलादेशने 34.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. मेहदी हसन मिराज आणि नजमूल शांतो ही जोडी विजयाची शिल्पकार ठरली.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक आणि फजलहक फारुकी.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकीब अल हसन (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने