ICC World Cup 2023 : भारत जिंकतोय पण या अपयश झाकून चालणार नाही

 

ब्युरो टीम : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य आहे. रोहित ब्रिगेडने टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून या सहा सामन्यातही विजय मिळवलाय. 12 अंकांसह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड सारख्या मातब्बर टीम्सन नमवलय. टीम इंडियाच्या विजयाच वैशिष्ट्य म्हणजे ते कोणा एका प्लेयरवर अवलंबून नव्हते. प्रत्येक विजयाचा वेगवेगळा नायक होता. टीम इंडियाच्या या विजयात काही खेळाडूंच अपयश झाकलं जातय. यात स्टार ओपनर शुभमन गिल सुद्धा आहे. शुभमन गिलचा हा पहिला वर्ल्ड कप आहे. टुर्नामेंट सुरु होण्याआधी गिलला डेंग्यु झाला होता. त्यानंतर तो अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू शकला नाही.

टुर्नामेंट सुरु होण्याआधी गिल चागंल्या फॉर्ममध्ये होता. यावर्षी वनडेमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 1200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयसीसी वनडे रँकिंगध्ये तो दुसऱ्या नंबरवर आहे. पण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये गिलने आतापर्यंत निराश केलय. शुभमन गिलने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चार सामन्यात त्याने 104 धावा केल्या आहेत. यात 53 हायेस्ट स्कोर आहे.

टीमच नाही, तर फॅन्सही निराश

बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने 53 धावा केल्या होत्या. आयसीसी टुर्नामेंटसमध्ये गिलची बॅट तशीच शांतच राहिलीय. 8 इनिगमध्ये त्याने फक्त 151 धावा केल्या आहेत. शुभमन गिल कॅप्टन रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर आहे. रोहित उत्तम फॉर्ममध्ये आहे. आक्रमक बॅटिंग करतोय. पण त्याचवेळी शुभमनने टीमलाच नाही, तर फॅन्सनाही निराश केलय. टीम इंडियाने सेमीफायनलध्ये प्रवेश केला आहे. लीग स्टेज संपेपर्यंत गिल एखादी मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.  टीम इंडियाचा पुढचा सामना किती तारखेला?

गिलचा वनडे करिअरमधील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने 39 सामन्यात 62 च्या सरासरीने 2021 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा सेंच्युरी, एक द्विशतक आणि 10 हाफ सेंच्युरी आहेत. 208 त्याचा हायेस्ट स्कोर आहे. हे आकडे पाहूनच गिल क्लास क्रिकेटर असल्याच लक्षात येतं. तो स्वत: सुद्धा खराब फॉर्म विसरुन प्रतिस्पर्धी टीमवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी उत्सुक असेल. टीम इंडियाचा पुढचा सामना 2 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होईल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध 5 आणि 12 नोव्हेंबरला मॅच होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने