ब्युरो टीम : भारतात 12 वर्षानंतर पुन्हा एकदा आयसीसी वनडे वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. एकूण 45 दिवस क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असू शकते हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाकडून कुणाला संधी?
चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पूरक ठरु शकते. तसेच फलंदाजांसाठीही खेळपट्टी मदतशीर ठरु शकते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात 15 पैकी कोणत्या 11 खेळाडूंना संधी द्यायची हा सर्वात मोठा पेच कॅप्टन रोहित शर्मा याच्यासमोर असणार आहे. कारण नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्यात एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी आपला दावा मजबूत केला. टीम इंडियाने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती.
टीम इंडिया
कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत नेहमीप्रमाणे शुबमन गिल सलामीसाठी येईल. तर विराट कोहली तिसऱ्या स्थानी खेळेल. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल खेळू शकतो. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या पाचव्या स्थानी खेळण्याची संधी मिळू शकते. तर सूर्यकुमार यादव याची सहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येईल. अखेरच्या क्षणी या दोघां-तिघांवर फटकेबाजी करुन फिनीशिंग टच देण्याची जबाबदारी असेल.
बॉलिंगची जबाबदारी कुणावर?
रवींद्र जडेजा याच्यावर बॅटिंगसह फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. तसेच आर अश्विन यालाही संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे जडेजा आणि अश्विन अनुभवी जोडी कागांरुंना फिरकीवर कशी नाचवते,याकडे लक्ष असेल. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या तिघांवर राहिल.
टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टिप्पणी पोस्ट करा