ब्युरो टीम : इस्रायल आणि हमास युद्धा दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एक मोठ वक्तव्य केलय. या वक्तव्याने सगळेच चक्रावून गेलेत. ज्यो बायडेन यांनी या युद्धाशी भारताच नाव जोडलय. तुम्ही म्हणाल इस्रायल आणि हमास युद्धाशी भारताचा काय संबंध?. इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सीमांशी दूरदूपर्यंत भारताचा संबंध नाहीय. मग इस्रायल-हमास युद्धाशी भारताचा काय संबंध?. अलीकडेच दिल्लीत G20 परिषद झाली. या परिषदेत एक घोषणा झाली. ही घोषणा सुद्धा इस्रायल-हमास युद्धामागे एक कारण आहे, असं ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. दिल्लीत G20 परिषदेदरम्यान भारत-मिडिल ईस्ट-यूरोप आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. हे सुद्धा हमासने इस्रायलवर हल्ला करण्यामागच एक कारण आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दावा केला असला, तरी त्यांच्याकडे पुराव्याचा आधार नाहीय. बायडेन यांनी स्वत: सांगितलय, माझी जी समज आहे, त्या आधारावर मी हे मुल्यांकन केलय
अमेरिकेत एका पत्रकार परिषदेत ज्यो बायडेन यांनी हा दावा केला. “हमासने इस्रायलवर जो हल्ला केला, त्यामागे भारत-मिडिल ईस्ट-यूरोप आर्थिक कॉरिडोर सुद्धा एक कारण असू शकतं. माझ्याकडे याचा कुठला पुरावा नाहीय. पण माझा आतला आवाज मला सांगतोय, इस्रायल क्षेत्राच्या एकीकरणासाठी आम्ही काम करतोय हे सुद्धा हल्ल्यामागच एक कारण असू शकतं” दिल्लीत आयोजित G20 परिषदेत नव्या आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. या कॉरिडोरची घोषणा भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE, फ्रान्स, जर्मनी यांनी संयुक्तपणे केली. चीनच्या बेल्ट अँड रोडला विकल्प म्हणून या घोषणेकडे पाहिल जात होतं. या कॉरिडोरच्या माध्यमातून खाडी देशांसोबतही आपण जोडले जाणार आहोत. युरोपही जोडलं जाईल. बायडेन काय म्हणाले?
“मागच्या काही आठवड्यात मी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्रपती सिसी, पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती अब्बास आणि सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्ससोबत कॉरिडोरबद्दल चर्चा केलीय” असं बायडेन म्हणाले. “इस्रायलच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. भविष्याच्या या योजनेत पॅलेस्टाइनच्या लोकांच्या इच्छा, आकांक्षा लक्षात घेतल्या जातील” असं बायडेन म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा