Manoj Jarange Patil :येवल्याच्या सभेतून साधला भुजबळांवर निशाणा जरांगे पाटलांची हाक 'मराठा आरक्षणासाठी अंतरवलीला या..'

 

ब्युरो टीम :  मराठा आरक्षणाचा लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत आहे. आज (सोमवार, ९ ऑक्टोंबर) मनोज जरांगे पाटील यांची नाशिकच्या येवल्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

येवल्याच्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील  यांनी आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे असे म्हणत सरसकट कुणबी आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हाटायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.

भुजबळांबर निशाणा...

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी "आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने त्यांचाही बंदोबस्त केला, असा टोला छगन भुजबळांना लगावला. तसेच ज्या मराठा आंदोलकावर हल्ला झाला त्यांच्यावर आज मुंबईत शस्रक्रिया आहे. आमच्यावर हल्ला का केला ? याचे उत्तर अजूनही दिले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

या सरकारला दिलेली मुदत 14 ऑक्टोबरला संपत आहे. तर आम्ही सरकारला दिलेला वेळ 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला सर्वांनी काम सोडून अंतरवलीला यायचे आहे.. असेही ते यावेळी म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने