Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राजकीय संघटना काढणार? पहा मनोज जरांगे काय म्हणाले

 

ब्युरो टीम : “छत्रपती शिवाजी महाराज यांना बळ मिळाले. आमच्या आरक्षण लढ्याला बळ मिळावे. सरकारसह मंत्र्यांना सबुद्धी द्यावी, मराठा समाजावर अन्याय दूर व्हावा, शेतकरी दुष्काळाचे सावट दूर होवो, सरकारने मदत करावी” अशा भावना तुळजा भवानीच्या दर्शनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्या. “आज देतो, उद्या सत्ता आली की देतो असे सगळे पक्ष म्हणाले. मात्र, आता आरक्षणाशिवाय माघार नाही आम्ही मागणीवर ठाम आहोत. सरकारने फूट पाडणे व इतर डाव टाकू नये, असे डाव टाकून काय संदेश देताय हे समाज जाणतो” असं जरांगे पाटील म्हणाले. “आपण एकत्र आहोत. ओबीसी एकत्र नांदू, आमची एकच भूमिका शांतता ठेवू. तिन्ही पक्षांनी भान ठेवावे, ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी. आम्हाला पाठिंबा देणारा कोणी असो, त्याने सोबत यावे, आमंत्रण देणार नाही, हे काही लग्न नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“खुर्चीवर आंदोलन दडपण्यासाठी भुजबळ यांना बसविले आहे का ? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी त्यांना समज द्यावी. लोकशाहीत आमहाला अधिकार नाही का आंदोलन करायचा?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. “कायदा-सुव्यस्था राबवायची जबाबदारी सरकारची आहे. सगळे मराठा मंत्री एकत्र आले की, 2 तासात मराठा आरक्षण मिळेल. मी कोणतीही राजकीय संघटना किंवा पक्ष काढणार नाही, आमच्या डोक्यात नाही, आमची ती वाट नाही. आपले एकच लक्ष्य मराठा आरक्षण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्णय घेण्याची क्षमता आहे, ते आरक्षण देऊ शकतात” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.  ‘सत्तेकडे एकनाथ शिंदे यांनी थोडे कामी बघावे’

“40 दिवसानंतर कोण एकनाथ शिंदे यांना साथ देत नाही की शिंदे साथ देत नाहीत हे जाहीर करणार” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. “सत्तेकडे एकनाथ शिंदे यांनी थोडे कामी बघावे व आरक्षण द्यावे. समाज त्यांना डोक्यावर घेईल” असं मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे हे तुळजापूरहून सोलापूरकडे निघालेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने