Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी शेतकऱ्यांनी फिरवला उभ्या पिकावर; बीड मधील 'या' शेतकऱ्याने केली अनोखी मदत

ब्युरो टीम : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात तब्बल 300 एकर जमिनीवर झालेली विराट सभा सर्वांनीच पाहिली, अनुभवली. मात्र या सभेसाठी ज्या जमिनी शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या, त्या जमिनीवर सोयाबीन कपाशी सह काही पिकं जेसीबीच्या साह्याने उपटून फेकण्यात आली. एवढा मोठा त्याग करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी बीड जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातला दिलदार शेतकरी पुढे आला आहे. गजानन साळीकराम तौर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्यानं नेमकं काय केलं, हे आता आपण जाणून घेऊया.

उभ्या शेतातली पिकं उपटून ज्यांनी या सभेसाठी जमीन उपलब्ध करून दिली, त्या शेतकऱ्यांसाठी तौर यांनी रब्बी हंगामासाठी १० क्विंटल गहू बियाणे आणि शेतकऱ्यांच्या बैलांसाठी २१ बॅग सरकी पेंड दिली असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लवकरच या साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. स्थानिक कमिटीकडे हे साहित्य देण्यात आलं असून संबंधित कमिटी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना हे साहित्य वाटप करणार आहे

गजानन तौर या शेतकरी मित्रानं मदतीसाठी जो काही पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल त्यांचं बीड जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड कौतुक होत आहे. त्यागाची ही भावना प्रेम आणि आदर यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे तौर या शेतकरी बांधवाबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाज बांधवांचं अप्रत्यक्षपणे व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मदत करणारा हा शेतकरी बांधव तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने