Maratha Arkshan : सावरगाव (भूम) येथे सकल मराठा समाजाच्यावतीने तयार जाळत केली आरक्षणाची मागणी

ब्युरो टीम : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. त्यांनी आज सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर उद्या संध्याकाळपासून पाणी पिणं बंद करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. तर दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. काही ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत टायर जाळण्याचादेखील प्रकार समोर आलाय. बीड, धाराशिवमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. 

धाराशिव मधील भूम तालुक्यातील सावरगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षण मिळेपर्यंत या नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशी शपथ मराठा समाजाने घेतली आहे. शिवाय गावात तयार जाळत निषेधही व्यक्त केला आहे. तसेच समस्त सावरगावकरांनी हा सामुहिक निर्णय घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने