Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न दोघांनी एकत्र बसून सोडवावा; शरद पवार स्पष्ट बोलले

 

ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर पहिल्यांदा भाष्य केलं. "महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्राने एकत्र बसून मराठा समाज प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार बघ्याची भूमिका घेतायत का? असा प्रश्न मला पडला आहे. कारण अजून कोणतीच पावलं उचलली नाहीत", असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिर्डी दौऱ्यात केलेल्या टीकेला उत्तर दिलं. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्रानं एकत्र बसून मराठा समाजाचा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार बघ्याची भुमिका घेतायत का? असा प्रश्न मला पडला आहे, कारण अजून कोणतीच पावलं उचलली नाहीत." तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांच्या बारामतीतील रद्द झालेल्या दौऱ्यावरही भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी माळेगावला जाणं टाळलं हे योग्य आहे. वातावरण गरम असताना तिथं न जाणं हेच योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

मोदींना ज्याची भिती वाटते, ते त्याबाबत बोलले : शरद पवार 

पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत, याबाबत बोलताना मराठा आरक्षणाबाबत ते बोलले नाहीत, कारण त्यांना ज्याची भिती वाटते, ते त्याबाबत बोलले, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर थेट निशाणाही साधला आहे. 


अजित पवारांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द

अजित पवारांच्या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला. माळेगाव कारखान्यापर्यंत अजित पवारांना जाऊ दिलं जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आलेला. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या विरोधातदेखील बारामतीत घोषणाबाजी केली जात आहे. राजकीय पुढाऱ्यांसह नेत्यांना बारामती तालुक्यात फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, असं पत्र बारामतीतील कार्यकर्त्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिलं होतं. त्यानंतर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांनी बैठक झाली ही बैठक निष्फळ ठरली. अजित पवारांना कोणत्याही परिस्थितील माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला येऊ देणार नाही या भूमिकेवर मराठा कार्यकर्ते ठाम होते.



 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने