MS Dhoni : वर्ल्डकप 2019 च्या उपांत्य फेरीचा किस्सा धोनीने सांगितला; पराभूत झाल्यानंतर रडलो..

 

ब्युरो टीम : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताने पाच पैकी पाच सामने जिंकत अव्वल स्थान गाठलं. त्यामुळे उपांत्य फेरीचं स्थान निश्चित झालं आहे. पण 2019 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या पराभवानंतर भारतीय चाहत्यांनी मनं तुटली होती. इतकंच काय तर महेंद्रसिंह धोनी याच्या डोळ्यातही अश्रू आले होते. हा क्षण कधीच भारतीय क्रीडाप्रेमी विसरू शकत नाही. कारण ही स्पर्धा महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची मॅच होती. इतकं वर्षे उलटल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने तेव्हा नेमकं काय होतं ते सांगितलं आहे. गुरुवारी बंगळुरुमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये महेंद्रसिंह धोनी याने उपांत्य फेरीतील पराभवाबाबत सांगितलं आहे.

महेंद्रसिंह धोनी याने सांगितलं रडण्याचं कारण

“जेव्हा तुम्ही एखादा सामना कमी फरकाने पराभूत होता. तेव्हा भावनांवर आवर घालणं कठीण होतं. मी प्रत्येक सामन्यासाठी माझा प्लान तयार ठेवतो. त्या दिवशी माझा शेवटचा सामना होता. मी निवृत्तीची घोषणा एका वर्षानंतर केली पण त्याच दिवशी मी तो निर्णय घेतला होता. आम्हाला काही गॅजेट दिले जातात आणि ते ट्रेनरला परत करायला गेलो. तेव्हा त्याने सांगितलं की ठेवून दे कामाला येईल. पण तेव्हा त्याला कसं सांगणार की ते आता माझ्या काहीच कामाचे नाहीत.”, असं महेंद्रसिंह धोनी यांनी सांगितलं.

“आपल्या भावनांना आवर घालणं कठीण होतं. 12-15 वर्षे तुम्ही क्रिकेट खेळत असता. पण जेव्हा तुम्हाला कळतं की यापुढे खेळायचं नाही. तेव्हा कंठ दाटून येतो आणि आपसूक अश्रू येतात.”, असं महेंद्रसिंह धोनी याने सांगितलं. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे.

महेंद्रसिंह धोनी याने निवृत्तीनंतर काहीच सांगितलं नव्हतं. 15 ऑगस्ट 2020 ला त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने फोटोसहीत एक व्हिडीओही शेअर केला होता. “तुमचं प्रेम आणि सोबतीसाठी धन्यवाद. 2019 पासून निवृत्त समजा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने