MS Dhoni :धोनी आयपीएलमध्ये खेळणार? पहा काय म्हणाला धोनी

 

ब्युरो टीम :   महेंद्रसिंह धोनी हा तीन तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या जगातील मोजक्या कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने 2007 मध्ये टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यावेळी धोनी IPL तरी खेळणार की नाही अशी चर्चा होती. 

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळत राहिला. 2021 आणि 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी शेवटचा खेळेल आणि त्यानंतर निवृत्त होईल, अशी शक्यता चाहत्यांना होती. त्यामुळे धोनीच्य सर्व सामन्यांना सर्वच मैदानांवर चाहत्यांची एकच गर्दी होती. आता 2024 मध्ये धोनी आयपीएल खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धोनीने स्पष्ट केलंय की अजून तो आयपीएलपासून दूर गेलेला नाही. 

धोनीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीतील उत्तरांनी धोनीने धक्के दिले. मुलाखत घेणाऱ्याने धोनीचा उल्लेख निवृत्त क्रिकेटपटू असा केला. जसं की तू आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहेस, असं मुलाखतकार म्हणाला. 

हे ऐकताच धोनी म्हणाला, मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे. धोनीच्या या उत्तराने तो यापुढेही आयपीएल खेळत राहणार का याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये निर्णय घेणार आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने