Narendra Modi : ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली

 

ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते आज हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण झालं. यावेळी त्यांनी विविध विकासकामांविषयी माहिती दिली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबा महाराज यांच्याशी शेकडो विठ्ठल भक्तांचं भावनिक नातं होतं. त्यामुळे वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गजांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. बाबा महाराज यांचं निधन होणं ही खरंच खूप मोठी पोकळी निर्माण होणारी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय.

“मला आज सकाळीच देशाचे एक अनमोल रत्न वारकरी संप्रदायाचे वैभव ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी समजली. बाबा महाराजांनी कीर्तन, प्रवचनच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं जे काम केलं ते कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यांची बोलण्यातील सहजता, त्यांची प्रेमळ वाणी, त्यांची बोलण्याची शैली मनाला खूप स्पर्श करायची. ते जय जय रामकृष्ण हरी भजन गायचे तेव्हा त्याचा प्रभाव काय व्हायचा ते आम्ही पाहिलं आहे . मी बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने