NCP Crisis :. शरद पवारांचे म्हणणे अजित पवारांनी ऐकले ; दिल्लीतील पक्ष कार्यालयात केले हे काम


ब्युरो टीम : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात असून जोरदार संघर्षही पाहायला मिळत आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी अजित पवार गटाला त्यांचे फोटो वापरण्यास मनाई केली होती. शरद पवार यांच्या या इशाऱ्याची अजित पवार गटाने गंभीर दखल घेतली असून प्रफुल पटेल यांनी याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.

नव्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो नाही...


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार गटाच्या दिल्लीमधील पक्ष कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. लवकरच या कार्यलायात अजित पवार यांच्या बैठका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावणे टाळले असून प्रफुल पटेल यांनी यावर स्पष्टिकरण दिले आहे.

काय म्हणाले प्रफुल पटेल?

"दिल्लीत आम्ही नव्या कार्यालयाचे नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये उद्घाटन करत आहोत. शरद पवार  यांची इच्छा होती की त्यांचा फोटा लावून नये, म्हणून फोटो लावला नाही. अजित पवार आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा फोटो वापरला जाईल... असे प्रफुल पटेल म्हणाले.

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "येत्या आमच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. तसेच आम्हाला बाकी राज्यात काम करायची गरज होती पण आम्हाला काम करता आले नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार नाही," असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या महिला आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या आरोपावरही प्रफुल पटेल यांनी स्पष्टिकरण दिले. मीरा बोरवणकर यांनी आरोप करणं कितपत योग्य आहे. ज्य काही सूचना अजित पवार यांनी केल्या होत्या त्याचा रिमार्क आहे का? पुस्तक विकण्यासाठी असं करणं योग्य नाही, असे प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने