OTT : 'बॅटल फॉर सेवास्तोपोल' 'एका शूरवीर सेनानी महिलेची सत्य कथा

 


ब्युरो टीम: जागतिक इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु जगाने त्यांची कधी दखल घेतली नाही. अशीच एक शूर आणि धाडसी महिला होऊन गेली जिने आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. ही कथा ५ ऑक्टोबर २०२३ रोजी 'बॅटल फॉर सेवास्तोपोल' चित्रपटाच्या माध्यमातून 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर  प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

'बॅटल फॉर सेवास्तोपोल' हा चित्रपट मूळचा रशियाचा असून चित्रपटाचे दिग्दर्शन 'सेर्गे मोक्रिट्स्कीय' यांनी केले आहे. कथा एका तरुण सोव्हिएत महिला ल्युडमिला हिच्या भोवती फिरते. ल्युडमिला जर्मन आक्रमणाशी लढण्यासाठी सैन्यात सामील होऊन दुसऱ्या महायुद्धात सर्वात प्राणघातक बंदुकधारी सैनिक होते. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच हृदयद्रावक घटना घडतात ज्याने तिचं मन खचत जातं.

'बॅटल फॉर सेवास्तोपोल' म्हणजे फक्त सीमेवरच्या लढाई बद्दल नाही तर एका स्त्री सैनिकाच्या मनाचा वेध घेऊन प्रेक्षकांचं मन पिळवटून टाकणारा चित्रपट आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने