Overweight Issue : वाढत्या वजनावर चुकीचा सल्ला टाळाना नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील

ब्युरो टीम : बदलत्या जीवनशैलीनुसार आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याची बदललेली वेळ, झोपण्याचा दिनक्रम, जंक फूडचे सेवन यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

मधुमेह, हृदयविकार, वाढत्या वजनाच्या समस्या आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. अशातच सध्याचा तरुण वर्ग हा वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही गोष्ट करताना सर्वात आधी मित्र मानला जातो तो इंटरनेट. सध्या सोशल मीडियाच्या जगात इन्फ्लुएंसर आणि सेलिब्रेटींच्या आरोग्यविषयींच्या जाहिरातीवर विश्वासही तितक्या प्रमाणात ठेवला जात नाही. 

देशातील ७६ टक्के लोक आरोग्याशी संबंधित निर्णय हे कुटुंब आणि मित्रांच्या सल्ल्याने घेतात. सर्वेक्षणानुसार असे समोर आले की, ५८ टक्के भारतीय लोक वजन कमी करण्याचा विचार तेव्हा करतात जेव्हा कपडे अधिक घट्ट होऊ लागतात. तसेच मित्र-परिवारातील लोक वाढलेल्या वजनाबद्दल बोलू लागतात. त्यावेळी खाण्यापिण्याच्या गोष्टीत बदल केला जातो.

'वर्ल्ड फूड डे'च्या दिवशी 'फिटलो अॅप'द्वारे 'स्टेट ऑफ योर प्लेट' सर्वेक्षनातून पाच हजार लोकांनी त्या अॅपवर अनेक आरोग्याशी सबंधित गोष्टीवर प्रतिक्रिया दिल्यात. एजेंसी सर्वेक्षणात ३३ टक्के महिलांनी सांगितले की, कुटुंबातील जबाबदारीसोबतच मुलांच्या संगोपनाची देखील जबाबदारी असते. याचे टेन्शन घेऊन ते अतिरिक्त प्रमाणात खातात ज्यामुळे आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. तसेच ३५ टक्के पुरुषांनी म्हटलं की , रोजच्या ऑफिसच्या कामामुळे त्यांना ही आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की,५७ टक्के भारतीय पाश्चिमात्य देशांप्रमाणे रोजच्या तसेच सणावारांच्या दिवसात मीठ आणि सर्वाधिक तेल असणारे अन्नपदार्थ (Food) जास्त खातात, परंतु पाश्चिमात्य देशांतील लोक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. पश्चिमेकडील लोक पुरेसा व्यायाम किंवा खेळांमध्ये व्यस्त असतात केवळ ४६ टक्के भारतीय थोड्या प्रमाणात व्यायाम करतात आणि ५५ टक्के चालणे पसंत करतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने