ब्युरो टीम : गेल्या १९/२० वरपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे भाजपचे महत्वाचे नेते, व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणाला राम राम ठोकला आहे. याबाबत त्यांनी आपल्या x ट्वीटर वर आपल्या भावना मांडल्या आहेत.
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र!
टिप्पणी पोस्ट करा