Pune-Nashik Highway : भविष्यात नाशिक चे महत्व वाढणार ; पुणे- नाशिक द्रुतगती मार्गाचे अंतर कमी होणार

 

ब्युरो टीम : महाराष्ट्रात पुणे-मुंबई प्रमाणे पुणे-नाशिक प्रवास नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. या प्रवासासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतात. दोन्ही शहरांमधील जवळपास 220 किलोमीटर असलेले हे अंतर पार करताना वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हा मार्ग द्रुतगती मार्ग नाही. यामुळे अनेक ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. आता पुणे ते नाशिक अंतर कमी होणार आहे. तब्बल 50 किलोमीटरने हे अंतर कमी होणार आहे. तसेच हा मार्ग सहा पदरी द्रुतगती मार्ग होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई महामार्गाप्रमाणे वेगाने या मार्गावरुन जाता येणार आहे. या मार्गावर वाहनांचा वेग वाढून प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.

असा असणार हा महामार्ग

पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाला सुरुवात पिंपरी-चिंचवडच्या तळवडे आणि चिखली लगतच्या म्हाळुंगे येथून सुरू होणार आहे. तसेच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत असणारा महामार्ग सहापदरी रुंद करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. तळवडे येथे हा महामार्ग सुरु होणार असून म्हाळुंगे आंबेठाणकडून कोरेगाव येथे जाणार आहे. कोपरगाववरुन किवळे कडूस- चास घोडेगावपर्यंत हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. त्यानंतर जुन्नर अकोले संगमनेर येथून नाशिक जिल्ह्यात हा महामार्ग पोहचणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सिन्नरवरुन नाशिकपर्यंत द्रुतगती महामार्ग होणार आहे.

पुणे नाशिक जवळ येणार

पुणे नाशिक ही दोन्ही महत्वाची शहरे वेगवेगळ्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पुणे ते नाशिक सेमीहायस्पीड मार्गाची घोषणा करण्यात आली. या रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात अजून सुरु झाले नाही. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याकडे लक्ष दिले आहे. यामुळे लोकसभेच्या 2024 निवडणुकीपूर्वी या महामार्गासंदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन आणि पुणे नाशिक द्रुतगती महामार्गामुळे हे दोन्ही शहरे अधिक जवळ येणार आहेत. भविष्यात पुणे-मुंबई प्रमाणे पुणे नाशिक या दोन्ही शहरांचे महत्व वाढणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने