Pune Universiti: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या दडपशाही धोरणांच्या विरोधात निषेधार्थ सभा संपन्न

ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे NSUI व इतर समविचारी संघटनांनी एकत्रित येत विद्यापीठ प्रशासनाच्या दडपशाही धोरणांच्या विरोधात निषेध सभेचे आयोजन केले होते. दिनांक ०७/१०/२०२३ रोजी विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. कमवा व योजनेच्या विद्यार्थीच्या मानधनात ४५ वरून ६० रूपये वाढ करण्यात यावी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या जयंती साजरी करावयाच्या महापुरुषांच्या सुचीत करण्यात यावा. या मागण्या घेऊन विद्यार्थी व संघटना प्रतिनिधी निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने उभे असताना पोलिस प्रशासनाने विद्यापीठाच्या सांगण्यावरून पीएचडी संशोधक विद्यार्थी राहुल ससाणे व ओंकार बेनके यांना पोलीस गाडीत डांबून ठेवले होते. या विद्यापीठ प्रशासनाच्या दडपशाही धोरणांच्या विरोधात काल NSUI व इतर संघटनांनी एकत्रित येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या समोर निषेध सभा घेतली. यावेळी पुणे शहर व जिल्हा NSUI चे अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख उपाध्यक्ष , अक्षय कांबळे, सरचिटणीस रितेश मोहिते, पर्वती विधानसभा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ओम भवर क्रीडा युवक काँग्रेसचे पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष आशुतोष शिंदे तसेच लोकायत , राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, तुकाराम शिंदे, समाधान दुपारगुडे -विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती इ. प्रतिनिधी व संघटना उपस्थित होत्या.  

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने