Pune University: पुणे विद्यापीठातील फूडमॉलला विद्यार्थीनी ठोकले टाळे ; पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी

ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फुडमॉलमध्ये गेली कित्येक दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नाही. विद्यार्थींना जेवणासोबत नाविलाजाणे २० रूपयांची बॉटल विकत घ्यावी लागत आहे. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या फुडमॉलमध्ये पिण्याचे पाणी मिळू नये ही खूप मोठी शोकांतिका आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या सर्व मेसमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि आता पिण्यासाठी पाणी नाही म्हणून सर्व विद्यार्थीनी एकत्रित येऊन फुडमॉलमधील सर्व दुकाने बंद केली आहेत. 


कोट-

अनेक दिवसांपासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही अशा तक्रारी आमच्याकडे विद्यार्थी करत होते. आज सर्व विद्यार्थीनी एकत्रित येऊन फुडमॉल बंद केला आहे. आमची विद्यापीठ प्रशासनानास विनंती आहे की त्यांनी तात्काळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा लवकरच तीव्र धरणे आंदोलन केले जाईल. 

दयानंद शिंदे ( BJYM ) 

विद्यापीठाच्या वेगवेगळ्या मेसमध्ये जेवणाच्या ताटात आळई प्लास्टिक झुरळं सातत्याने निघत आहेत. आणि आता तर पिण्यासाठी पाणी देखील दिले जात नाही. हि खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्ही याचा निषेध करतो. 

ओंकार बेनके ( राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस - अध्यक्ष)

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने