RSS : 'दक्ष' व्हा... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वेबसिरीज येतेय!



ब्युरो टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सर्वात मोठे नेटवर्क म्हणून पाहिले जाते. संघाच्या कामाचे अनेकांना कुतूहल वाटते. १९२५ साली स्थापन झालेली ही संघटना आज देशातील सर्वात ताकदवान संघटनांपैकी एक बनली आहे. संघाच्या प्रवासाबद्दल अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मात्र आता त्यांच्यासह संघ स्वयंसेवकांसाठी एक चांगली बातमी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आता वेबसिरीज येत असून दसऱ्याच्या दिवशी त्याचे पोस्टरही लॉंच करण्यात आले आहे.

नुकतेच विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरआरएस) 98 वा वर्धापनदिन साजरा झाला. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये स्थापन केलेल्या आरआरएसचा 2025 साली शतकमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. आता संघाचा इतक्या वर्षांचा इतिहास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून संघाची आतापर्यंतची वाटचाल वेब सिरिजच्या स्वरूपात लोकांना पाहता येणार आहे. याची घोषणा नुकतीच करण्यात आली असून वेब सिरीजचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. ‘वन नेशन’ असे या वेब सिरीजचे नाव असून एक-दोन नव्हे तर तब्बल सहा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक या वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.

मंगळवारी, (24 ऑक्टोबर) विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यादिवशी, आरआरएसच्या आतापर्यंतच्या प्रवासावर आधारित ‘वन नेशन’ या वेब सिरीजचे पोस्टर लॉंच करण्यात आले. या वेब सिरिजमधून संघाची आतापर्यंतची वाटचाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या वेब सिरीजचे दिग्दर्शन एक-दोन नव्हे तर तब्बल 6 दिग्दर्शक करणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शकांमध्ये विवेक अग्निहोत्री, प्रियदर्शन, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यु मंथन, मंजू बोरा आणि संजय पुरन सिंह चौहान यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने