Sharad Pawar : शरद पवार की अजित पवार कोण आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ; पहा हे काय म्हणाले

 

ब्युरो टीम : शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं अजितदादा गटाचे नेते वारंवार सांगत होते. मात्र, काल अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजितदादा गट संपूर्ण पक्षावरचा दावा सोडण्यास तयार नसल्याचं यातून स्पष्टही झालं आहे. तर, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? असा सवाल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं आहे.

अजित पवार हे आज जुन्नर दौऱ्यावर होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. मी महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य लोकांच्या स्वच्छ कल्पना आहेत. सामान्य माणूस काय विचार करतोय हे महत्त्वाचं आहे. काल किल्लारीत होतो. 20 हजार लोक जमले होते. त्यांची भाषण ऐकल्यावर वेगळं चित्र दिसतं. हे चित्र महाराष्ट्रात आहे. वेगळी भूमिका कोणी घेतली असेल तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही. पण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेरही राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे साधारण लोकांना माहीत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

खड्डे तरी बुजतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहे. महिन्यातून दुसऱ्यांदा ते पुण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान येत असतील तर चांगली गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान आल्यावर निदान रस्त्यावरी खड्डे बुजले जातील. त्यामुळे त्यांचं स्वागत करतो, असा चिमटा त्यांनी लगावला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं मला माहीत नाही. निमंत्रण दिलंही असेल. सरकारी कार्यक्रम असेल तर आमदार आणि खासदारांना बोलावतात. पण मला काही निमंत्रणाचं माहीत नाही, असं पवार म्हणाले.

एकत्र जेवलो

आमदार अतुल बेनके हे अजितदादा गटाचे आहेत. मात्र, ते आज शरद पवार यांच्यासोबत दिसले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, अतुल बेनके माझ्या गाडीत नव्हते. पण आम्ही एकत्र जेवण केलं, असं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपसोबत जाणार नाही

मी आता पर्यंत किती चिन्हावर लढलो त्यामुळे चिन्ह महतावाचे नाही तर लोकांचे विचार आणि चेहरा महत्वाचा असतो, असं सांगतानाच जे लोक भाजपसोबत आहेत. ते राष्ट्रवादीचे असू शकत नाही. जे लोक भाजपसोबत गेले असतील तो विचार आम्ही स्वीकारणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला लोकांनी भाजप विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आयोगाचं समन्स आलंय

निवडणूक आयोगाने मला समन्स दिलं आहे. येत्या 6 तारखेला मला बोलावलं आहे. मी जाणार आहे. माझे वकीलही सोबत असतील. त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू, असंही त्यांनी सांगितलं.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने