Sharad Pawar : शरद पवार निवडणूक आयोगात दाखल; आज प्रत्यक्ष सुनावणीला सुरवात

 

 

ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील दाखल झाले आहेत. शरद पवार या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहिल्याने सध्याच्या घडामोडींना अतिशय जास्त महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे सुनावणी सुरु होण्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतलीय. त्यामुळे आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात झालीय. आजच्या सुनावणीत एकाच गटाला भूमिका मांडण्यासाठी वेळ दिला जाण्याची शक्यता आहे. 4 ते 6 या दोन तासांच्या वेळेत ही सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केस लढलेले वकील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू मांडणार आहेत. वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह हे अजित पवार यांची बाजू मांडतील. तर शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनुसिंघवी हे बाजू मांडतील. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झालीय. दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनावणी सुरु होण्याआधी मोठं वक्तव्य केलं. आमच्याकडे 53 पैकी 43 आमदार आहेत, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यानंतर आता सुनावणी पार पडत आहे.

सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा दाखला देण्यात आलाय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने