Shivsena Case : मुलाखत देण्यास वेळ; मग निर्णय घेण्यास काय हरकत ; सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांवर ताशेरे

 

 

ब्युरो टीम : शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणाी सुरू आहे. मागील सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. या सुनावणीतही न्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारले असून"त्यांना माध्यमांमध्ये बोलायला वेळ आहे, पण सुनावणीसाठी वेळ नाही का?" अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या  आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीत वेळकाढूपणा करत असल्याचे सांगत मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते. तसेच न्यायालयाने आमदारअपात्रतेसंदर्भात नवीन वेळापत्रक सादर करा, असेही निर्देश दिले होते.

आजच्या सुनावणीतही सुप्रीम कोर्टाने याच मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा एकदा कडक शब्दात ताशेरे ओढले. "विधानसक्षा अध्यक्ष माध्यमांमध्ये मुलाखती देतात, पण हे करायला वेळ नाही का? कोर्टाचा जरा आदर राखला जावा. ते म्हणतात की आम्ही सरकारच्या co-equal branches चा आदर राखतो. पण, आम्ही सभागृहाच्या पटलावर काय होतंय यात हस्तक्षेप करत नाही.." असे CJI धनंजय चंद्रचूड म्हणाले.

दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत, दसऱ्याच्या सुट्टीत तुषार मेहतांनी अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक तयार करावे असे सांगत कोर्टाने कालमर्यादा घालून देण्यापूर्वी अध्यक्षांना एक शेवटची संधी देणं गरजेचं आहे. 30 ऑक्टोबरला हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं जात आहे. असे न्यायालयाने म्हणले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने