supriya sule : त्यांना राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला फेकण्याचं काम सुरु ; सुप्रिया सुळे म्हणाल्या ...

 

ब्युरो टीम : स्व. गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्या दिग्गज नेत्यांच्या दोन्ही मुलींचे भाजपने हाल केले. त्यांना राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला फेकण्याचं काम भाजप करत आहे. भाजपाने त्यांना न्याय द्यावा, अन्यथा मोठी बहीण म्हणून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. मुंडे यांनी उसतोड मजुरांसाठी पुकारलेल्या संपात आम्ही निश्चित मदत करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

पाथर्डी शहरातील संस्कार भवन येथे सुप्रिया सुळे यांनी महिला व जनतेशी मुक्त संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राज्याच्या प्रमुख रोहिणी खडसे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अँड. प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, ऋषीकेश ढाकणे, चंद्रकांत म्हस्के, माधव काटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे आदी यावेळी उपस्थित होते. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, कारवाईचा धाक दाखवत सध्या पक्ष व आमदार फोडण्याचा उद्योग सुरु आहे. शिवसेना व राष्ट्रवादीची कोणी स्थापना केली, हे जनतेला माहित आहे. त्यांच्याकडे खोके असतील पण माझ्याकडे शरद पवार आहेत. जीवाचे रान करून मी राष्ट्रवादी जिवंत ठेवत दिल्लीसमोर झुकणार नाही. केंद्रात व राज्यात महाआघाडीचे सरकार येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने