The Burning Train : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार, वाचा नेमकं काय घडलं?

 

ब्युरो टीम :  नगर - आष्टी रेल्वेला वाळूंज (ता. नगर) जवळ आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या दोन डब्यांना लागली होती ती पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली. गाडीत गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. 

अहमदनगर - आष्टी मार्गावरील रेल्वेला कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. आग कशामुळं लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी आग लागल्याचं समोर आलं आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात त्यांना ४ वाजता यश आलं. या गाडीतील प्रवासी वेळेतच खाली उतरल्यानं बचावले आहेत. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली होती त्यानंतर आगीचं प्रमाण वाढल्यावर एकूण पाच डब्यांना आग लागल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. आगीचं प्रमाण वाढल्यानंतर एकूण गार्ड ब्रेक कोच आणि चार डबे असे एकूण पाच डब्यांना आग लागली आहे. चार वाजताच्या दरम्यान आग विझवण्यात यश आलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने