ब्युरो टीम: दिवंगत माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे आज सायं ५ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी ‘गौरव शिष्यवृत्तीचे’ वाटप डॉ.श.ब मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष सिम्बायोसिस संस्था, डॉ. सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर , आमदार प्रसाद लाड,आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार अतुल बेनके, आमदार सत्यजित तांबे , माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, प्रशासक राज्य सहकारी बँक विद्याधर अनास्कर ,आजी माजी आमदार, नगरसेवक, विविध पक्षांचे व संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीसाठी एकूण ३६८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये इयत्ता पाचवी ५३ विद्यार्थी, आठवी ४७ विद्यार्थी , डिप्लोमा व डिग्री शिक्षण घेणाऱ्या २६८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कृषी अधिकारी विकास हेमाडे, प्रबोधन मंचाचे बिपीन मोदी, मराठा अॕन्थ्रोपीनर असोसिएशन अध्यक्ष अरूण निम्हण, विद्या सहकारी बँक संचालक संजय मयेकर यांनी मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली.
इयत्ता पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि काहीच गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. डिग्री व डिप्लोमाच्या गुणवंत विद्यार्थांना आर्थिक निकष, गुणवत्ता आणि थेट मुलाखत या निकषांवर गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना या सोहळ्यात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा