Anna Hajare ; राज्यात आरक्षणासाठी मराठा- ओबीसी समाजचे आंदोलने सुरु असतांना अण्णा हजारे य'या' साठी करणार आंदोलन

 

ब्युरो टीम : राज्यात मराठा सामाजाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारही हादरले आहे. त्यानंतर ओबीसी आणि धनगर समाजाकडूनही आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहेत. परंतु आपल्या आंदोलनामुळे राज्याला नव्हे तर केंद्र सरकारला हादरुन सोडणारे अण्णा हजार पुन्हा सक्रीय झाले आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा आंदोलन करणार आहेत. यामुळे पुन्हा राज्यात अण्णा हजारे यांचे आंदोलन राज्यात दीर्घ काळानंतर दिसणार आहे.

अण्णा हजारे यांनी कशासाठी पुकारले आंदोलन

अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे आंदोलन करणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, देशातील सैनिकांचे भविष्य अधांतरी असू नये, यासह सैनिकांच्या मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील माजी सैनिक सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अण्णा हजारे करणार आहे. या आंदोलनामुळे देशभरातील सैनिक सरकार विरोधात राळेगणसिद्धीत एकटवणार आहे. त्यांना अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहे.

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात केले आंदोलन

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी राज्यात आणि नवी दिल्लीत अनेक वेळोवेळी आंदोलने केली. अण्णा हजारे यांनी १९८० पासून १६ पेक्षा जास्त उपोषणे केली आहेत. अण्णांच्या आंदोलनानंतर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. अण्णा हजारे यांचे लोकपालसाठी झालेले आंदोलन लक्षवेधी ठरले होते. या आंदोलनामुळे सर्व देशाचे लक्ष अण्णा हजारे यांच्याकडे लागले होते. अण्णा हजारे यांनी ११६ दिवसापेक्षा जास्त दिवस उपोषण केले आहे. अण्णा यांच्या आंदोलनामुळे राज्यातील ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे. त्यात शिवसेना आणि भाजपचे मंत्रीसुद्धा होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने