ब्युरो टीम: ज्योतिष शास्त्रात खूपच महत्त्वाचा मानला जाणारा सूर्य ग्रहाने 17 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 7 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. या बदलांमुळे चार राशीवर सूर्यदेवांची चांगलीच कृपा झाली आहे.
ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ज्योतिष शास्त्रासार या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. सूर्य ग्रह दर 30 दिवसांनी राशी बदलतो. आता 17 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 7 मिनिटांनी सूर्य ग्रहाने तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. तर, बुध ग्रहाने सुद्धा 6 नोव्हेंबर 2023 ला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. वृश्चिक राशीत या दोन ग्रहांची उपस्थिती काही राशींना खूप फायदेशीर ठरणार आहे.
या राशींना होणार फायदा
मेष
सूर्य व बुध यांची वृश्चिक राशीतील युती ही मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत बढती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे संक्रमण खूप शुभ परिणाम देणारं आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारी कामे पूर्ण होतील. उत्पन्न वाढेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील.
कन्या
कन्या राशीतील व्यक्तींसाठी सूर्य ग्रहाचं संक्रमण चांगल्या दिवसांची सुरुवात करणार आहे. या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल
कुंभ
सूर्याच्या राशीतील बदलामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे. ऑफिसमध्ये मोठं यश मिळू शकते. तुमच्या खास मित्राकडून तुम्हाला काही मोठा फायदा होऊ शकतो.
दरम्यान, ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ज्योतिष शास्त्रासार या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. अर्थात त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
टिप्पणी पोस्ट करा