Bhau Kadam : ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या सेटवर मोठा किस्सा; फॉरेनच्या बाईसाठी भाऊ कदम शिकले इंग्लिश

 

ब्युरो टीम : ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ नक्कीच आहे. आता नुकताच एकदा येऊन तर बघा चित्रपटाची टीम टीव्ही9 मराठीच्या आॅफिसला पोहचली. यावेळी धमाका करताना टीम दिसली. भाऊ कदम यांनी तर थेट एकदा येऊन तर बघा चित्रपटाच्या सेटवरील काही किस्सेच सांगून टाकले. एकदा येऊन तर बघा या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेश कुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांनी केलीये. हा चित्रपट 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

विशेष म्हणजे एकदा येऊन तर बघा हा चित्रपट अगोदर 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, दिवाळीनिमित्त अनेक चित्रपट रिलीज झाल्याने निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत 8 डिसेंबरला चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला. नुकताच भाऊ कदम यांनी मोठा खुलासा करत चित्रपटाच्या सेटवरील काही किस्से सांगितले आहेत.

चित्रपटात रशियन मुलगीसोबत डान्स करताना भाऊ कदम हे दिसणार आहेत. यावरच बोलताना भाऊ कदम हे दिसले. भाऊ कदम यांना विचारण्यात आले की, रशियन मुलीसोबत डान्स करण्याचा अनुभव कसा राहिला. यावर भाऊ कदम म्हणाले की, मुळात म्हणजे तिला माझी भाषा कळत नव्हती आणि मला तिची भाषा कळत नव्हती.

मी जसा डान्स करतो तोच डान्स तिने केला. चित्रपटाच्या टीमने हा देखील खुलासा केला की, भाऊ कदम यांनी चित्रपटाच्या सेटवर सर्वाधिक मजा ही रशियन मुलीसोबतच केलीये. रशियन मुलीसोबत सेटवर कशाप्रकारे भाषेचा प्राॅब्लेम येत असत हे सांगताना देखील भाऊ कदम हे दिसत आहेत. भाऊ कदम म्हणाले की, एका सीननंतर सांगण्यात आले की, कट..परंतू ती रशियन मुलगी उठलीच नाही. मग तिला ज्यावेळी Done म्हणून सांगितले गेले, त्यावेळी ती उठली.

याप्रकारे अनेक किस्से चित्रपटाच्या सेटवरील सांगताना भाऊ कदम हे दिसले. भाऊ कदम म्हणाले, मी त्या रशियन मुलीकडून काही शब्द, शिकलो…ओके, डन हे सर्व शब्द मी तिच्याकडूनच शिकलो. मी तिला ठाणे आणि डोंबिवलीची भाषा शिकवली. एकदा येऊन तर बघा हा चित्रपट नक्कीच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने