Big Boss 17 : सलमान खान दाखवतोय ऐश्वर्या शर्मा हिला आरसा ; बि बॉस १७ चर्चेत

 

ब्युरो टीम : बिग बाॅस 17 सध्या तूफान चर्चेत आहे. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 चा आज विकेंडचा वार आहे. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये धमाका होताना दिसतंय. सलमान खान या विकेंडच्या वारला घरातील काही सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसणार आहे. बिग बाॅस 17 च्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये स्पष्ट दिसतंय. सलमान खान हा ऐश्वर्या शर्मा हिच्यावर संतापल्याचे दिसतंय.

सलमान खान हा ऐश्वर्या शर्मा हिला आरसा दाखवण्याचे काम करतोय. ऐश्वर्या शर्मा आणि पती नील भट्ट यांच्यामध्ये आतापर्यंत घरात मोठे वाद झाल्याचे बघायला मिळाले. नुकताच ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्यामधील वाद टोकाला गेला. यादरम्यान नील हा ऐश्वर्या शर्मा हिला समजावून सांगताना दिसला. मात्र, ऐश्वर्या शर्मा ही नील याला उलटे बोलताना देखील दिसली.

इतकेच नाही तर भांडतानामध्ये अनेकदा नील भट्ट याला ऐश्वर्या शर्मा ही थेट ये चल निघ, तू चल निघ…हे म्हणताना दिसली. विशेष म्हणजे हे नील भट्ट याला अत्यंत चुकीच्या पद्धतीने ऐश्वर्या शर्मा हिने म्हटले. आता यावरूनच ऐश्वर्या शर्मा हिला सलमान खान खडेबोल सुनावताना दिसत आहे. नील भट्ट हा खूप ऐकून घेत असल्याचे म्हणताना देखील सलमान खान हा दिसला आहे.

फक्त ऐश्वर्या शर्मा ही नील भट्ट यालाच नाही तर सर्वांनाच भांडणामध्ये विचित्र बोलताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये कडाक्याची भांडणे झाली. ऐश्वर्या शर्मा आणि विकी जैन यांची कायमच भांडणे होताना दिसतात. ऐश्वर्या शर्मा ही पती नील भट्ट याच्यासोबत बिग बाॅसच्या घरात दाखल झालीये.

बाॅस 17 मध्ये मनारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये देखील एक मोठा वाद हा बघायला मिळतोय. मनारा चोप्रा हिला टार्गेट करताना अंकिता लोखंडे ही दिसत आहे. इतकेच नाही तर मनारा चोप्रा हिच्या विरोधात अंकिता लोखंडे घरातील इतर सदस्यांना भडकावून देताना दिसत आहेत. मनारा चोप्रा यामुळे अनेकदा थेट रडताना देखील दिसली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने