BJP : भाजपचा संजय राऊतांवर पलटवार, आदित्य ठाकरेंचा फोटो शेअर करीत विचारला 'हा’ प्रश्न



ब्युरो टीम : संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा एक कथित फोटो शेअर केल्यानंतर आता राऊतांना प्रत्युत्तर देताना भाजपनं देखील जोरदार पलटवार केलाय. भाजपने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा एक फोटो ट्विट केला असून एक प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपच्या या पलटवारानंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे याचा कसिनोतील कथित फोटो शेअर केला आहे. संजय राऊतांच्या ट्विटवर पलटवार करताना भाजपनं आदित्य ठाकरे यांचा एका पार्टीतला फोटो ट्विट केला आहे. तसेच म्हटलं की, ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी आहेत, तिथला हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडं जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजूभाऊ (संजय राऊत) आदित्य ठाकरेंच्या या ग्लासात कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे?’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने