ब्युरो टीम : सध्याच्या काळात अनेक लोक लठ्ठपणाचे शिकार होताना दिसत आहेत. अनहेल्दी आहार, बदलती जीवनशैली अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. या लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा झटका, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या निर्माण होतात. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात लोकांना लठ्ठपणाची समस्या सतावताना दिसत आहे.
एका संशोधनानुसार, लोकांच्या लठ्ठपणापासाठी 200 वर्षांपूर्वीची ब्रिटिश राजवट जबाबदार आहे. होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे. 1757 ते 1947 पर्यंत भारताला इंग्रजांनी गुलाम म्हणून ठेवले होते. या काळामध्ये भारतात दुष्काळ, पूर आला होता. ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये 25 मोठे दुष्काळ पडले होते. यामध्ये सहा कोटींहून अधिक लोकांचा जीव गेला होता.
एपिजेनेटिक्स हा एक अभ्यास आहे ज्यामध्ये आपल्या वर्तनाचा आपल्या डीएनएवर होणारा परिणाम दिसून येतो. तर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 200 वर्षांपासून सतत पडलेल्या दुष्काळामुळे दक्षिण आशियातील लोकांच्या डीएनएमध्ये अनेक बदल झाले होते. त्यामुळे भारतीयांच्या अनेक पिढ्यांचे शरीर उपासमारीला अनुकूल झाले होते. या परिस्थितीमुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकाराचा धोका, मधुमेह या समस्या निर्माण झाल्या होत्या. यातील महत्त्वाची समस्या म्हणजे लठ्ठपणा, त्यावेळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा निर्माण झाला होता.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आशिया लोकांचे शरीर हे इन्सुलिन प्रतिरोधक झाले आहे. त्यामुळे चरबी, यकृताच्या पेशी, स्नायू रक्तातील ग्लुकोज शोषून घेऊ शकत नाहीत. तसेच ऊर्जेसाठी त्याचा वापर देखील करू शकत नाही. त्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसते.
टिप्पणी पोस्ट करा