Cross Culture &Religion: पुण्यातील जुनैद इमाम व असीम त्रिभुवन यांनी बनवलेला ‘क्रॉस कल्चर अँड रिलिजन’ माहितीपटाची न्यू यॉर्क येथील महोत्सवासाठी निवड

 

ब्युरो टीम : पुण्यातील जुनैद इमाम व असीम त्रिभुवन यांनी बनविलेल्या‘क्रॉस कल्चर अँड रिलिजन’ या माहितीपटाची निवड न्यू यॉर्क मधील न्यू साऊथ फिल्म फेस्टिवल या चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.  या माहितीपातामध्ये माहितीपटामध्ये  अमेरिकेतील भारतीय ख्रिस्ती समाजाचे वास्तव मांडण्यात आले आहे.  या माहितीपटासाठी जुनेद इमाम यांनी दिग्दर्शक म्हणून तर असीम त्रिभुवन यांनी क्रीएटीव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

महोत्सवाच्या स्पर्धा विभागात 18 नोव्हेंबर 2023 रोजी दाखविण्यात येणारा हा माहितीपट अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशाच्या ख्रिस्ती समाजाचे चित्रण करतो. 

‘या माहितीपटाची मूळ संकल्पना, अमेरिकेमध्ये समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या, भारतीय वंशाच्या डॉ आरीफा जावेद यांची होती. त्यांच्याच आर्थिक पाठिंब्यातून व योग्य मार्गदर्शनातून या माहितीपटावर काम झाले’, अशी माहिती जुनेद इमाम यांनी सांगितली. 

“गेली अनेक दशके भारतीय ख्रिस्ती समाज हा अमेरिकेत नवीन संधी च्या शोधात स्थलांतरित होत आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृतीमधून च्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित झालेल्या या समाजाने अमेरिकन समाजजीवनाला एक वेगळाच आयाम दिला आहे. हे सर्व पदर माहितीपटात उलगडणे हे आमच्यासाठी खरं तर एक आवाहन होते,” असे मत असीम त्रिभुवन यांनी मांडले. 

याशिवाय या माहितीपटासाठी पुण्यातील जयेश महामुनी यांनी संकलक म्हणून, निखिल पंडित यांनी संगीतकार म्हणून, जीवन भांगे यांनी साउंड डिझायनर म्हणून तर अनिकेत साळुंके यांनी पोस्ट प्रोडक्शन सुपरवायजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने