Grampanchayt : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नं १ चा पक्ष ; ठाकरे पिछाडीवर

 

ब्युरो टीम : राज्यात काल रविवारी 5 नोव्हेंबर 2023 रोजी एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी 74 टक्के मतदान पार पडलं. हे मतदान शांततेत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2-2 गट होते त्यामुळे कोणता गट कुणावर भारी पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अनेक ठिकाणी तर बड्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. बारामतीमधील 8 ग्रामपंचायतींपैकी 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने विजय मिळवला. या ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपा आणि दादा यांच्याच चांगलीच चुरशीची लढत दिसत होती. शेवटी गावगाड्याचा कारभार भाजपच्याच हातात आलाय आणि भाजप सगळ्यात जास्त जागा जिंकून नंबर वन आलाय.

भाजप नंबर वन

आत्तापर्यंत म्हणजेच दुपारी 3.30 वाजेपर्यंत भाजपने 602 जागांवर विजय मिळवलेला आहे. भाजप 602, शिंदे गट 226, ठाकरे गट 103, काँग्रेस 154, पवार गट 155 आणि दादा गट 315 असा निकाल आहे. यात भाजप आघाडीवर आहे आणि त्याच्या खालोखाल नंबर लागतो तो अजित पवार गटाचा त्यामुळे दादांसहित भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. भाजपा प्रदेश मुख्यालयात देखील आनंदाचं वातावरण होतं. भाजप जास्तीत जास्त जागेवर विजय मिळवून नंबर वन ठरलाय असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलंय.

विरोधकांना सणसणीत चपराक

बारामतीत महायुती, मोहोळमध्ये भाजपला 100 टक्के यश मिळालंय. जामखेड, जुन्नर, वैभववाडी याठिकाणी अनुक्रमे रोहित पवार, अमोल कोल्हे, वैभव नाईक यांना जनतेनं नकार दिलाय तिथेही भाजपच जिंकल्याने भाजप हा जनतेच्या मनातील पक्ष असल्याचं केशव उपाध्ये म्हणालेत. महायुतीने महाविकासआघाडीपेक्षा तिप्पट जागा मिळवलेल्या आहेत. विरोधकांकडून “निवडणुका एकदा घ्या मग चित्र स्पष्ट होईल” असं वारंवार आव्हान दिलं जात होत. शेवटी भाजपने याला चांगलंच उत्तर दिलंय. भाजपने संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना, विरोधकांना सणसणीत चपराक लागवलीये असं केशव उपाध्ये पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. आजच्या ग्रामपंचायतींच्या निकालात ठाकरे गटाने सगळ्यात कमी जागेवर विजय मिळवलाय त्याबद्दल केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाचं विशेष अभिनंदन केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने