Health : कॉफी पिताय मग या गोष्टींकडे लक्ष द्या

 

Health ; कॉफी पिताय मग या गोष्टींकडे लक्ष द्या 

ब्युरो टीम : बहुतेक लोकांना कॉफी प्यायला भरपूर आवडते. मग सकाळी उठल्यानंतर, कामात कंटाळा आल्यानंतर, मित्र मैत्रिणींसोबत गप्पा मारताना कॉफीचा आस्वाद आवर्जून घेतला जातो. तसंच कॉफी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. कॉफीमध्ये कॅफिन आढळते जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


तुम्ही जर एंग्जायटी विकाराने त्रस्त असाल तर कॉफीचे सेवन करू नका. कारण अशा लोकांनी जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच अशा लोकांना पॅनिक अटॅकचा देखील धोका असू शकतो. त्यात तुम्ही जर कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला अस्वस्थता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे एंग्जायटी असलेल्या लोकांनी कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये.

जेव्हा तुमच्या शरीरातील हाडे कमकुवत होतात तेव्हा या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात. ज्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. तसंच जर तुम्ही जास्त प्रमाणात कॉफी पीत असाल तर त्याचा तुमच्या हाडांवर नकारात्मक परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ज्यांना ऑस्टिओपोरोसिसचा त्रास आहे अशांनी जास्त प्रमाणात कॉफी पिऊ नये.

गरोदर असलेल्या स्त्रियांनी कॉफी पिऊ नये. तसेच डॉक्टर देखील गरोदर स्त्रियांना कॉफी न पिण्याचा सल्ला देतात.  ज्यांना जास्त कॉफी आवडत असेल अशा गरोदर स्त्रियांनी अगदी कमी प्रमाणात कॉफीचे सेवन कराव. कारण 200 मिलिग्रॅम पेक्षा जास्त कॉफी पिणे त्यांच्या मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कॉफी गरोदरपणा पिऊ नये. तसेच गरोदरपणात कॉफी प्यायल्यामुळे बीपी देखील वाढू शकतो, त्याच्यामुळे गरोदर स्त्रियांनी कॉफी पिणे टाळावे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने